Wednesday, February 15, 2023

पहाटेचा शपथविधी....मराठी वात्रटिका


 आजची वात्रटिका

-----------------------

पहाटेचा शपथविधी

जरी नाका तोंडात पाणी जाऊन,
सत्तेची नौका केव्हाच बुडाली आहे.
तरीही पहाटेच्या शपथविधीने,
महाराष्ट्राची मात्र झोप उडाली आहे.

कुणा कुणासाठी होते सुखद स्वप्न,
कुणा कुणासाठी कटू आठवण आहे!
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात,
ही साखर झोपेतली साठवण आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6720
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
15फेब्रुवारी2023
----------------------------------
मराठी वात्रटिका

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...