Monday, February 20, 2023

राजकीय भांडवल...मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
------------------------

राजकीय भांडवल

हजार आणि लाखाच्या गोष्टी,
कालबाह्य आणि छोट्या आहेत.
कोट्यावधीच्या व्यवहारावर,
आज कोट्यावर कोट्या आहेत.

कधी वाटते कोट्या खोट्या आहेत,
कधी वाटते कोट्या खऱ्या आहेत.
खोक्याच्या गोष्टी डोक्यावरून,
गेलेल्याच आपल्यासाठी बऱ्या आहेत.

राजकारण म्हणजे इंडस्ट्री झाली,
तिचा व्यवहारच भांडवली आहे!
कुणी फुकट गेले,कुणी विकत गेले,
आपण समजावे ही मांडवली आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6726
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
20फेब्रुवारी2023

No comments:

बोलून चालून ते गिबली आहे ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- बोलून चालून ते गिबली आहे सगळी दुनिया गिबली फोटोसाठी, फोटोसाठी राब राब राबली आहे. लोकांनी दिले काय? आले का...