Saturday, February 11, 2023

आचार विचार संहिता...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

आचार विचार संहिता

दारूकाम आणि नाचकामाभोवती,
जयंत्या मयंत्या फिरायला लागल्या.
वैचारिक पेरणी होण्याऐवजी,
नको त्याच गोष्टी पेरायला लागल्या.

कुणी धंदा म्हणून पाहतो आहे,
कुणी चंदा म्हणून पाहतो आहे.
खर्च तर होणारच पण,
इथे नको नको तो पैसा वाहतो आहे.

जल्लोष असावा;उत्साह असावा,
पण जयंत्यांचा धांगडधिंगा होऊ नये!
वैचारिक जागर होण्याऐवजी,
जयंत्यांचा टांग टिंग टिंगा होऊ नये!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6716
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
11फेब्रुवारी2023

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...