Sunday, February 19, 2023

उत्सवातली घुसखोरी....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

उत्सवातली घुसखोरी

समाज प्रबोधनाच्या उत्सवात,
आज छुपे घुसखोर वाढले आहेत.
पुढे पुढे जाणारे उत्सव,
घुसखोरांनी मागे ओढले आहेत.

कुठे घुसखोर आयोजक आहेत,
कुठे घुसखोर प्रायोजक आहेत.
उत्सवांची दिशा भरकटवणारे,
कुठे घुसखोरच नियोजक आहेत.

पैशांची लावणी,पैशांची पेरणी,
घुसखोरांची कावेबाज करणी आहे!
उत्सव मूर्तींच्या जागेवरती,
घुसखोरांकडून स्वतःचीच वर्णी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8181
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
19फेब्रुवारी 2023
 

No comments:

नेत्यांचे मित्र प्रेम...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- नेत्यांचे मित्र प्रेम राजकीय नेत्यांच्या मित्रांवरती, लोक उगीचच दात खात असतात. ते पुंडलिका वर दे...चा गजर...