Friday, February 3, 2023

सोशल मोबॅलिटी...3फेब्रुवारी 2023

आजची वात्रटिका
------------------------

सोशल मोबॅलिटी

कुणी आत्ममग्न होऊ लागले,
कुणी मनोरुग्न होऊ लागले.
चांगल्या चांगल्या लोकांचे,
चक्क मेंदू भग्न होऊ लागले.

आपले खाजगी आयुष्यही,
शेअर वर शेअर आहे.
ते तेही दाखवायला लागले,
आज कोणती अंडरवेअर आहे?

शॉर्ट व्हिडिओ मुळे तर,
काहीही रिलीज होऊ लागले!
असलेले नसलेले सगळे टॅलेंट,
मीडियावर उतू जाऊ लागले!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8166
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
3फेब्रुवारी 2023
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...