Monday, February 6, 2023

पेटी ते खोके....मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
-----------------------------

पेटी ते खोके

काल पेट्यांची भाषा होती,
आज खोक्यांची भाषा आहे.
लोकशाहीच्या कपाळावर,
मोठी चिंताजनक रेषा आहे.

धोकेबाज आणि खोकेबाज
खरोखर डोकेबाज आहेत.
खोकेबाजीच्या जादूवरती,
त्यांचे रोखठोक माज आहेत.

खोक्यामध्ये दडलेय काय?
ही चर्चाच न केलेली बरी आहे!
खोके अँड ऑल इज ओके,
अशीच आजची थेअरी आहे!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6712
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
6फेब्रुवारी2023
--------------------------------
मराठी वात्रटिका

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...