Sunday, February 12, 2023

बोलंदाजी ते झेलंदाजी ...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------

बोलंदाजी ते झेंलदाजी

कधी वाद दडवले जातात,
कधी वाद घडवले जातात.
विरोधात आणि बाजूनेही,
तयार ढोल बडवले जातात.

विरोधक आणि समर्थक,
हे वरवर जरी चेले असतात.
अंदर की बात अशी की,
ते पक्के झेले एके झेले असते.

जेवढे जास्त झेलंदाज,
तेवढे बोलंदाज चेकाळू लागतात!
जेवढे समर्थन आणि विरोध,
तेवढे वाद बोकाळू लागतात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8174
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
12फेब्रुवारी 2023
 

No comments:

सोशल स्टेटस ......प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------- सोशल स्टेटस आजच्यासारखा राजकीय स्वार्थ, आम्ही यापूर्वी कधीच पाहिला नाही. शुभेच्छासारख्या शुभेच्छांनासुद्...