Sunday, February 5, 2023

पक्षीय मनस्थिती...मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------------

पक्षीय मनस्थिती

पक्षात येणाऱ्या जाणाऱ्यांचा,
खूप मोठा गफला आहे.
जो गेला तो गेला,
राहिलेला तरी आपला आहे.

आलेला तो बाबू असतो,
गेलेला तो कार्टा असतो !
सगळे राज रोज होऊनही,
आपला चेहरा चोरटा असतो.

गेलेल्यापेक्षा आलेल्याचे,
मन खूप मोठे असते!
बंदा जातो,चिल्लर येते,
आपलेच नाणे खोटे असते!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------------------------
फेरफटका-8168
दैनिक झुंजार नेता
वर्ष -23वे
5फेब्रुवारी 2023
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...