Saturday, February 4, 2023

कर्म धर्म संयोग....मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
------------------------

कर्म धर्म संयोग

ज्याला जसे ताणता येईल,
तसे त्याच्याकडून ताणले जाते.
विसंवादाला संवादाने,
पुन्हा पुन्हा एकत्र आणले जाते.

आघाड्यांमधली ताणाताणी,
अगदी अखंडपणे चालूच असते.
सहन होत नाही;सांगता येत नाही,
सर्वांनाच सत्तेची लालूच असते.

प्रत्येकाच्या अधर्मालाच,
आघाडीचा धर्म म्हटले जाते!
तरीही आघाडी फुटलीच तर,
त्याला आघाडीचे कर्म म्हटले जाते!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------
चिमटा-6710
दैनिक पुण्यनगरी
वर्ष -18 वे
4फेब्रुवारी2023
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 19नोव्हेंबर2024 वर्ष- चौथेअंक - 172 वा

दैनिक वात्रटिका l 19नोव्हेंबर2024  वर्ष- चौथे अंक - 172 वा l पाने -39 अंक डाऊनलोड लिंक  - https://drive.google.com/file/d/18nApDbukudT7hlNNJ...