आजची वात्रटिका
----------------------
माय-मावल्यांस विनंती
तुम्ही मम्मी व्हा,मॉम व्हा,
पण त्याआधी आई व्हा.
नसती उत-मात रोखायला,
तुम्ही दुधावरची साई व्हा.
आईपणा मिरवायला,
सांगा कसली चोरी आहे?
मातृत्त्वाची देणगी मिळाली,
म्हणूनच आई प्यारी आहे.
कशी व्हावी उतराई?
पाठीशी जिजाऊचा वारसा आहे!
आपला दुधखुळेपणा बघण्यासाठी,
आई सावित्रीचा आरसा आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-6029
दैनिक पुण्यनगरी
12जानेवारी2021
