Showing posts with label मुत्सद्देगिरी. Show all posts
Showing posts with label मुत्सद्देगिरी. Show all posts

Saturday, April 11, 2026

मुत्सद्देगिरी ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
मुत्सद्देगिरी
अविश्वास आणि धोका तर,
प्रत्येक पावलोपावली आहे.
ज्याच्या त्याच्या जीवावर उठलेली,
ज्याची त्याची सावली आहे.
आपापल्या सावलीचा,
कुणालाच भरोसा राहिला नाही.
एवढा मोठा राजकीय अविश्वास,
राजकारणानेही पाहिला नाही.
अविश्वास आणि दगाबाजीला,
म्हणूनच राजकारण म्हटले जाते!
मुत्सद्देगिरीच्या नावानं चांगभले..
पुन्हा पुन्हा राजकारण रेटले जाते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9244
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
11 एप्रिल 2026

 

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...