आजची वात्रटिका
---------------------
सत्ता आकर्षण
सत्तेसाठी कधी होतात लढया,
सत्तेसाठी कधी तह असतो.
सत्तेसाठी कधी द्रोह,
सत्तेचा सर्वांना मोह असतो.
सत्ता लोकोपयोगी असावी,
अशी भाबडी धारणा असते!
सत्ताधारी असोत वा विरोधक,
सर्वांची सत्ता हीच प्रेरणा असते!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------
फेरफटका-7623
दैनिक झुंजार नेता
19जून2021
