Showing posts with label साप्ताहिक वात्रटिका. Show all posts
Showing posts with label साप्ताहिक वात्रटिका. Show all posts

Sunday, March 8, 2026

मोर्चाचे पीक...साप्ताहिक वात्रटिका



साप्ताहिक 
वात्रटिका 
--------------------------------

मोर्चाचे पीक

जणू शेतकऱ्यांच्या हितावरती, 
सगळ्यांचेच राजकीय जीव आहेत. 
त्यामुळे शेतकऱ्यांचे मोर्चे, 
सदा सर्वकाल चिरंजीव आहेत.

मोर्चे कायम; समस्या कायम, 
हा प्रकार आश्चर्यकारक असतो.
झेंडे,नेते आणि घोषणा,
यांच्यामध्ये दरवेळी फरक असतो.

शक्ती,भक्ती,शक्ती आणि युक्तीने, 
शेतकऱ्यांना मोर्चात ओढले जाते !
शेतकऱ्यांच्या बळावरती, 
मोर्चांचे नवे नवे पीक काढले जाते !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
-----------------------------
साप्ताहिक सरकारनामा 
वात्रटिका - 77
वर्ष- दुसरे 
7 मार्च 2026

Thursday, May 29, 2025

ट्रम्प कार्ड.....साप्ताहिक सरकारनामा...वात्रटिका



साप्ताहिक 
वात्रटिका 
---------------------

ट्रम्प कार्ड 

शस्त्र संधीची फळे, 
जो भोगायचे तो भोगत आहे.
न होता थांबले तरी,
युद्धविराम म्हणावे लागत आहे.

ज्याला जसे जमेल तसे, 
आपले 'ट्रम्प कार्ड' खेळतो आहे.
त्यामुळेच प्रत्येकाच्या मनामध्ये, 
आज शंकासुर खेळतो आहे.

सगळेच अस्वस्थ असले तरी,
शांततेचा टॅग बसवावा लागतो !
आपापली सोय बघून,
बुद्ध पुन्हा हसवावा लागतो !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
------------------------
वात्रटिका
साप्ताहिक सरकारनामा
17 मे 2025

स्वार्थ रक्षण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- स्वार्थ रक्षण सरळ चालण्याची अपेक्षा असणारा, आता वाकडी वाट धरू लागला. ज्याला बसविले डोक्यावरती, तोच कानाच...