Thursday, October 29, 2020

नवी पिढी,नवे वाद

आजची वात्रटिका
----------------------------

नवी पिढी,नवे वाद

बॉलिवूडची नवी पिढी, जणू पूर्ण बिघडलेली आहे. उठता बसता वादग्रस्त होण्याची, त्यांनी आघाडी उघडलेली आहे.

वादासाठी विषयही कोणते? कधी भाषा;कधी प्रांत आहे ! अतिथी देवो भव, म्हणूनच महाराष्ट्र शांत आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ---------------------------------------- चिमटा-5958 दैनिक पुण्यनगरी 29ऑक्टोबर2020
------------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील
आणि दैनिक वात्रटिका
तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील
सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !!
https://suryakantdolase.blogspot.com
----------------------------

 

Wednesday, October 28, 2020

बाताडे आणि गाताडे

आजची वात्रटिका
------------------------------

बाताडे आणि गाताडे

जशा दुभत्या गाईच्या, लाथा गोड असतात. तशा सत्ताधाऱ्यांच्या, बाता गोड असतात.
बातावर गोड बाता ,
दणक्यात झडू लागतात! विरोधक तर गाताडेच, त्यांना त्या कडू लागतात !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ------------------------ फेरफटका-7445 दैनिक झुंजार नेता 28ऑक्टोबर2020
------------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील
आणि दैनिक वात्रटिका
तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील
सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !!
https://suryakantdolase.blogspot.com
----------------------------

 

गुपितांची पोलखोल


 आजची वात्रटिका

------------------------------

गुपितांची पोलखोल

इकडून तिकडे घुसताच पोपटासारखे बोलू लागले. कालपर्यंत जे उघडच होते, तेच गुपित म्हणून खोलू लागले.

सगळेच गुपित खोलण्याच्या, आता राजरोस धमक्या आहेत ! कितीही ढोल बडविले तरी, लोकांना वाटते टिमक्या आहेत !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड) मोबाईल-9923847269 ---------------------------------------- चिमटा-5957 दैनिक पुण्यनगरी 28ऑक्टोबर2020
------------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील
आणि दैनिक वात्रटिका
तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील
सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !!
https://suryakantdolase.blogspot.com
----------------------------

Tuesday, October 27, 2020

बेडूक आणि वाघ


 आजची वात्रटिका

------------------------------
बेडूक आणि वाघ
बेडकाच्या पिल्ल्याबरोबर,
बेडूकही खाडकन जागा झाला.
दसरा मेळाव्यानंतर तर,
बेडकाचा आणखीच त्रागा झाला.
बाल्या डान्स करीत म्हणाला,
बेडकाच्या पिल्ल्याने वाघ पाहिला !
खरा दशावतार पुढेच असेल,
आपण पहिला-दुसरा भाग पाहिला !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7444
दैनिक झुंजार नेता
27ऑक्टोबर2020
------------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील
आणि दैनिक वात्रटिका
तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील
सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !!
----------------------------

सत्तार्थी

आजची वात्रटिका
------------------------------
सत्तार्थी
आपण म्हणतो,राजकीय नेते;
विश्वासघातकी आणि स्वार्थी आहेत.
पण ते ना विश्वासघातकी,ना स्वार्थी,
ते फक्त आणि फक्त सत्तार्थी आहेत.
विश्वासघात आणि स्वार्थ,
हे शब्द खूप अलिकडचे आहेत !
पण सत्तार्थी सत्तार्थी असतात,
ते त्याहूनही पलिकडचे आहेत !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5956
दैनिक पुण्यनगरी
27ऑक्टोबर2020
------------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील
आणि दैनिक वात्रटिका
तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील
सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !!
----------------------------

1 Share



Monday, October 26, 2020

बाजार गप्पा


 आजची वात्रटिका

------------------------------
बाजार गप्पा
बटाटा डोळे वटारीत म्हणाला,
त्या कांद्याच्या नानाची टांग.
पुन्हा कांद्याने चाळीत चाळीत,
गाठली सफरचंदाची रांग.
मिरची ठसक्यात म्हणाली,
तुला तरी बाबा डोळे आहेत.
मी बेंबीच्या देठापासून ओरडते
पण त्यांच्या कानात बोळे आहेत ?
शेपू चुकचूकत म्हणाला,
आमचेही पार वांगे वासले आहे !
दलालांचीच भरती झाल्याने
बळीराजाचे बूड बसले आहे !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------
फेरफटका-7443
दैनिक झुंजार नेता
25ऑक्टोबर2020
------------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील
आणि दैनिक वात्रटिका
तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील
सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !!

कोरोनाची लसलस


 आजची वात्रटिका
------------------------------
कोरोनाची लसलस
कोरोना चक्रावून बोलला,
हा प्रकारच बिकट आहे.
तिथे तिथे म्हणे लस फुकट,
जिथे जिथे इलेक्शन निकट आहे.
उशिरा आली;माझी लसआली,
पण राजकारणाला विलाज नाही !
जे जे राजकारण करतात त्यांना;
जनाची आणि मनाची लाज नाही !!
-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------------------
चिमटा-5955
दैनिक पुण्यनगरी
26ऑक्टोबर2020
------------------------------------
वाचा आणि इतरांनाही शेअर करा.
माझ्या दैनिक पुण्यनगरीतील
'चिमटा'
आणि दैनिक झुंजार नेता तील
'फेरफटका'
या सदरातील
आणि दैनिक वात्रटिका
तसेच साप्ताहिक सूर्यकांती मधील
सतरा हजारांपैकी,
सहा हजारांहून जास्त
वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना शेअर करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा
वाचत रहा...नवा दिवस नव्या वात्रटिका !!
----------------------------
Image may contain: 1 person, text that says 'कोरोनाची लसलस कोरोना चक्रावून बोलला, हा प्रकारच बिकट आहे. तिथे तिथे म्हणे लस फुकट, जिथे जिथे इलेक्शन निकट आहे. उशिरा आली;माझी लसआली, पण राजकारणाला विलाज नाही! जे जे राजकारण करतात त्यांना; जनाची आणि मनाची लाज नाही -सूर्यकांत डोळसे, पाटोदा(बीड) बा.९९२३८४७२६९ वात्रटिका चिमा-।९।रशआन्टोवारीनर।ै,ुयकनारी https://sryakandolaseblogsot.com'
DrEknath Khandve

लपाछपीचा खेळ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- लपाछपीचा खेळ समाजकारणाआडचे राजकारण, लपविणे नेहमीच जड होत जाते. समाजकारणाआडचे राजकारण, कधी ना कधी उघड होत...