Saturday, March 27, 2010

सोय-गैरसोय

***** आजची वात्रटिका *****
**********************

सोय-गैरसोय

जशी उमेदवारी
नेत्याच्या पोराला मिळू शकते.
तशी उमेदवारी
एखाद्या चोराला मिळू शकते.

आपली लोकशाहीच
चोरां-पोरांच्या हवाली आहे !
अट्टल मवाल्यालाही
म्हणता येईना,हा मवाली आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

No comments:

आमदार निवास ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- आमदार निवास फोडाफोडीच्या राजकारणामुळे, सगळ्यांना चांगले दिवस येतात. सगळे फाईव्ह स्टार हॉटेल्स, चक्...