Thursday, March 4, 2010

देवाच्या दारी

***** आजची वात्रटिका *****
**********************

देवाच्या दारी

देवाच्या दारी जेंव्हा
भक्ती चेंगरली जाते.
श्रद्धाळू भक्ती तेंव्हा
खरोखर गांगरली जाते.

देवाच्या दारी जेंव्हा
प्रत्यक्ष मृत्यु गाठू लागतो.
नास्तिकांबरोबर अस्तिकांचाही
विश्वास तेंव्हा उठू लागतो.

आपणच आपल्या भक्तीची
आता लाज राखली पाहिजे !
देवाच्या दारातली गर्दी
होईल तेवढी रोखली पाहिजे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

No comments:

गोबेल्स नीती...आजची वात्रटिका ...दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका ----------------------------- गोबेल्स नीती जेवढा गंदा,तेवढाच अंधा, असा युद्धाचा धंदा आहे. दावे प्रतिदावे होऊ लागले, कोण मेला?...