Monday, March 8, 2010

ट्रॉफी ते सोनोग्राफी

***** आजची वात्रटिका *****
**********************

ट्रॉफी ते सोनोग्राफी

महिला दिनाच्या निमित्ताने
तिच्या हाती ट्रॉफी असते.
मुलगी नको,मुलगा हवा
यासाठीच तर सोनोग्राफी असते.

एकीकडे कौतुक,
दुसरीकडे स्त्रीत्त्व हा शाप आहे !
अबलीकरणाचे सबलीकरण
ही निव्वळ तोंडाची वाफ आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

1 comment:

Unknown said...

दागिने, लिपस्टीक ,मेंदी साड्या यातून तिची सुटका हवी
वाचन लेखन द्न्यान्साधना यात एक तरी घटका जावी
तुम्हाला अधिक प्रेरणा मिळावी या साठी आमची
" बाईच्या जातीसाठी " किंचित कविता

आमदार निवास ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- आमदार निवास फोडाफोडीच्या राजकारणामुळे, सगळ्यांना चांगले दिवस येतात. सगळे फाईव्ह स्टार हॉटेल्स, चक्...