Sunday, November 21, 2010

सहकारनामा

गाई आटल्या,
कोंबड्या खुडूक.
सूत गिरण्यांपुढे
अंधार बुडूक.

सहकारी संस्थांना
स्वाहाकाराची फूस.
मुळासकट खाल्ला
कारखान्यांनी ऊस.

शुगर कमी,
कारखाने आजारी.
पेशंट वाढता
डॉक्टरची बेजारी.

दुसर्‍याचे बघतो कोण?
प्रत्येकजण खुद्दार !
मागच्या पिढीकडून
सात पिढ्यांचा उद्धार !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...