Saturday, December 6, 2025

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
-----------------------------
यंत्र मंत्र आणि तंत्र
यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा,
निवडणुकीत वापर आहे.
नाहीच मिळाले यश तर,
मतदान यंत्रावर खापर आहे.
जसे जातीचे तंत्र आहे,
तसे धर्माचेही तंत्र आहे.
विरोधकांच्या पराभवासाठी,
कुठे काळया जादूचे यंत्र आहे.
यंत्र तंत्र आणि मंत्रांचा,
खरे तर जादुई मुद्दा आहे !
जणू काळी बाहुली सांगते आहे,
लोकशाही हीच अंधश्रद्धा आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9115
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
6 डिसेंबर2025
---------------------------

No comments:

यंत्र मंत्र आणि तंत्र...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------------- यंत्र मंत्र आणि तंत्र यंत्र,तंत्र आणि मंत्रांचा, निवडणुकीत वापर आहे. नाहीच मिळाले यश तर, मतदान ...