Thursday, December 25, 2025

भावबंधन.....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
-------------------------------
भावबंधन
संपली एकदाची भाऊबंदकी,
पुन्हा नव्याने भावबंधन आहे.
मराठीच्या हितालाच,
आता सर्वात प्रथम वंदन आहे.
तुटू नका;फुटू नका,
प्रचारानेसुद्धा ताल धरला आहे!
ज्याला सकाळचा भोंगा म्हटले,
तोच शिल्पकार ठरला आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
आजची वात्रटिका - 55
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
25 डिसेंबर 2025

 

No comments:

भावबंधन.....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------------------- भावबंधन संपली एकदाची भाऊबंदकी, पुन्हा नव्याने भावबंधन आहे. मराठीच्या हितालाच, आता सर्वात प्रथ...