Thursday, December 11, 2025

संमेलनांची चंगळ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------
संमेलनांची चंगळ
जे ते आपले घोडे दामटीत,
आपल्या घोड्यावर स्वार झाले.
त्यामुळेच साहित्य कमी पण,
साहित्य संमेलनेच फार झाले.
साहित्य संमेलन जसे,
चळवळ्या लोकांचे दिसते आहे.
तसे साहित्य संमेलन,
वळवळ्या लोकांचे दिसते आहे.
नको त्याच्या मांडीला मांडी नको,
संमेलनातून साहित्यालाच दांडी नको!
साहित्य संमेलनाच्या चढाओढीत,
साहित्य संमेलनाची बुळकांडी नको !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9120
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
11 डिसेंबर2025

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...