Monday, December 15, 2025

ऑनलाइन भामटे...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------
ऑनलाइन भामटे
जमेल तसे;जमेल तेव्हा,
गरजवंतांना वेड्यात काढू लागले.
सोशल मीडियाच्या जमान्यात,
ऑनलाइन भामटे वाढू लागले.
ऑनलाइन भामटे एकटे दुकटे नाहीत,
सोबत फॉलोवर्सच्या टोळ्या आहेत.
कुणीही भुलावं ; कुणीही डुलावं,
आशा त्यांच्या ऑनलाइन खेळ्या आहेत.
भामट्यांची भामटेगिरी म्हणजे,
एकमेकांची ऑनलाइन नक्कल आहे !
भामटे ते भामटेच आहेत,
गरजवंतांनाही कुठे अक्कल आहे ?
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9124
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
15 डिसेंबर2025

 

No comments:

daily vatratika...15dec2025