साप्ताहिक
वात्रटिका
--------------------------------
सर्पकारण
आरोप प्रत्यारोपाचे मुद्दे,
वाकडे तिकडे फरपटू लागले.
सगळे सरपटणारे प्राणी,
शब्दा शब्दातून सरपटू लागले.
ॲनाकोंडाच्या पाठोपाठ आला,
गांडूळ नावाचा दुतोंडी साप.
फणा काढीत फुसफुसला नाग,
हा कोणत्या जन्मीचा शाप?
राजकारण की सर्पकारण?
कसली बोली?कसला बाणा आहे?
सर्वांनी खात्री करायला हवी,
आपल्याही पाठीमध्ये कणा आहे !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------
साप्ताहिक सरकारनामा
वात्रटिका - 65
वर्ष- दुसरे
20 डिसेंबर 2025
No comments:
Post a Comment