आजची वात्रटिका
-----------------------
लाडकी बहिण योजनेला,
संपूर्ण देशभरात चालना आहे.
योजना कोणतीही असली तरी,
लाडक्या बहिणीशी तुलना आहे.
ज्यांनी ज्यांनी तुलना केली,
त्यांचा तुलनात्मक विचार आहे.
अतिरेक एवढा झाला की,
कळेना प्रचार की अपप्रचार आहे?
लाडक्या बहिणीच्या चर्चेमध्ये,
इथे प्रत्येक जण रमला आहे !
अति झाले आणि हसू आले,
अगदी असाच हा मामला आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9119
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
10 डिसेंबर2025

No comments:
Post a Comment