Wednesday, December 17, 2025

घराणेशाही आणि पीएचडी....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
घराणेशाही आणि पीएचडी
जशी राजकीय घराणेशाही वाढते आहे,
तशी पीएचडीतली घराणेशाही वाढते आहे.
दोन्हीही पीएचडीचे विषय असल्यामुळे,
त्यावरती संशोधन करणे भाग पडते आहे.
सत्य कितीही उघड असले तरी,
ते अभ्यासाअंतीच तपासावे लागेल !
कुठल्याही घराणेशाहीवर भाष्य करताना,
व्यक्तीस्वातंत्र्य मात्र जोपासावे लागेल !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 49
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
17डिसेंबर 2025

 

No comments:

दुष्काळी पाहुणचार ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- दुष्काळी पाहुणचार दुष्काळ पाहणी दौरा बघून, आमचे मतही ठाम झाले. एकाचा पाहुणचार करताना, दुसरेच हकन...