Tuesday, December 23, 2025

विजयाचा शिक्का ...आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
विजयाचा शिक्का
हवे ते राहिले बाजूला,
नको त्यालाच चेव आहे
निष्ठा आणि राजकीय तत्वांचा,
सरळ सरळ पराभव आहे.
हरलेल्यांनाही धक्का आहे,
जिंकलेल्यानाही धक्का आहे !
निवडणुकीतले अंतिम सत्य,
कपाळी विजयाचा शिक्का आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 54
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
23 डिसेंबर 2025

 

No comments:

आंदोलन संदेश.....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- आंदोलन संदेश कधी वाटले उपोषण, कधी वाटले मोर्चा आहे. दिल्लीतल्या आंदोलनाची, गल्लोगल्ली चर्चा आहे. आंदोलना...