Saturday, December 20, 2025

प्रचार रंगलाय काव्यात !....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------
प्रचार रंगलाय काव्यात !
आपल्या सगळ्यांची ओरड होती,
प्रचाराची घसरलेली पायरी आहे.
तोपर्यंत त्यांच्याकडून प्रचारात,
कवितेसोबत शेर - शायरी आहे.
कविता आणि शेर शायरीचे,
राजकारणावर चांगलेच गारुड आहे.
त्यांचा कलगी तुरा रंगत असतानाच,
सोबतीला एक नाथाचे भारुड आहे.
आपल्या पोटावर पाय देणार का?
तमाम कवी लोकांपुढे पेच आहे.
तुम्हाला नक्की आठवले असेल,
नेमका कुणाचा कुणाला टच आहे ?
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9129
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
20 डिसेंबर2025

 

No comments:

प्रचार रंगलाय काव्यात !....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------- प्रचार रंगलाय काव्यात ! आपल्या सगळ्यांची ओरड होती, प्रचाराची घसरलेली पायरी आहे. तोपर्यंत त्यांच्याकडू...