आजची वात्रटिका
------------------------
राजकीय भांडवल
जशी आपली गरज आहे,
तशी आपली खेळी पेश केली जाते.
जाती धर्माच्या नावावरती,
इथे प्रत्येक गोष्ट कॅश केली जाते.
असे मात्र कुणी समजू नका,
सगळ्यांचे एकमेकांशी धागे नाहीत!
इथे प्रत्येक गोष्ट कॅश करण्यात,
कुणीसुद्धा कुणाच्याही मागे नाहीत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 46
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
12डिसेंबर 2025
No comments:
Post a Comment