Thursday, December 25, 2025

बीस साल बाद..प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------
बीस साल बाद..
मराठी माणसाच्या इच्छेला,
अगदी मनापासून दाद आहे.
मराठी माणसाला जे वाटत होते,
ते सगळे बीस साल बाद आहे.
एका हाताने वाजत नाही म्हणूनच
अखेर त्यांची टाळीला टाळी आहे.
विठ्ठल कोण ? बडवे कोण ?
शोधायची महाराष्ट्रावर पाळी आहे.
लाव रे तो व्हिडिओची,
कुजबुज मात्र आत बाहेर आहे !
हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती,
भगव्या शाल जोडीचा आहेर आहे !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9133
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
25 डिसेंबर2025

 

No comments:

भावबंधन.....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------------------- भावबंधन संपली एकदाची भाऊबंदकी, पुन्हा नव्याने भावबंधन आहे. मराठीच्या हितालाच, आता सर्वात प्रथ...