साप्ताहिक
वात्रटिका
--------------------------------
ऑपरेशनचे पोस्टमार्टम
ऑपरेशन अमुक;ऑपरेशन तमुक,
ऑपरेशनचीसुद्धा चढाओढी आहे.
नाव कोणतेही असले तरी,
सर्वांचीच 'ऑपरेशन फोडाफोडी' आहे.
वरून वरून ऑपरेशन फोडाफोडी,
आतून मात्र ऑपरेशन ओढाओढी आहे.
काही काही ऑपरेशन मागची प्रेरणा,
आपल्याच पापाची फेडाफेडी आहे.
एकीकडे ऑपरेशन चालू असताना,
दुसरीकडेच ऑपरेशनची भूल आहे !
ऑपरेशन कुणाचेही असले तरी,
सध्या तरी खूपच सक्सेसफुल आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------
साप्ताहिक सरकारनामा
वात्रटिका - 64
वर्ष- दुसरे
13 डिसेंबर 2025
No comments:
Post a Comment