Sunday, December 14, 2025

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका
-----------------------

राजकीय ट्रेंड

त्याने त्याने ज्याचा त्याचा,
राजकीय बाणा जपला आहे.
तरी सांगता येत नाही,
कोण बरका?कोण आपला आहे?

आपलेपणा वाटतो कमी,
परकेपणा मात्र जादा आहे !
कारण बंडखोरावरतीच,
आजकाल प्रत्येक जण फिदा आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 48
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
14 डिसेंबर 2025
 

No comments:

दुष्काळी पाहुणचार ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- दुष्काळी पाहुणचार दुष्काळ पाहणी दौरा बघून, आमचे मतही ठाम झाले. एकाचा पाहुणचार करताना, दुसरेच हकन...