Wednesday, December 31, 2025

महानगरपालिका वृत्तांत ....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
महानगरपालिका वृत्तांत
कुणाची पुरती हौस फिटली आहे.
कुणाची आशाही मिटली आहे.
तिकीट वाटपाच्या कार्यक्रमाने,
मनपात परिसीमा गाठली आहे.
निष्ठेच्या फाटलेल्या आभाळाला,
सगळेच ठिगळ जोडत आहेत !
यजमान राहिले उपाशी,
पाहुणे मात्र पंगती झोडत आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 60
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
31 डिसेंबर 2025

 

No comments:

daily vatratika....31dec2025