Friday, December 12, 2025

शेतकरीनिष्ठ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------
शेतकरीनिष्ठ
कुणाची चर्चा मुद्देसूद आहे,
कोणाची चर्चा तर स्वरात आहे.
जिकडे बघावे तिकडे,
शेतकऱ्यांचीच चर्चा जोरात आहे.
सर्वांच्या चर्चेचे इरादे,
रोखठोक आणि स्पष्ट आहे.
त्यांच्या चर्चेवरून तरी भास होतो,
सगळेच शेतकरीनिष्ठ आहेत.
सगळेच घेतात शेतकऱ्यांची बाजू,
कुणीच विरोधात असत नाही !
सगळेच शेतकरीनिष्ठ वाटूनही,
त्याचा प्रत्यक्ष परिणाम दिसत नाही!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9121
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
12 डिसेंबर2025
 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...