आजची वात्रटिका
-----------------------
फ्लॅट वरती फ्लॅट चढावेत,
भ्रष्टाचाऱ्यांचा भ्रष्टाचार वाढता आहे.
महाराष्ट्रातील सदनिका घोटाळ्यांचा,
आलेख काही फ्लॅट नाही चढता आहे.
जिथे म्हाडा.... तिथे राडा....
घोटाळेबहाद्दरांचा एकच नारा आहे.
ज्यांना आपण आदर्श समजतो,
त्यांच्याही मागे घोटाळ्यांचा फेरा आहे.
कुठे झाकली मूठ सव्वा लाखाची,
कुठे कुठे झाकलेले माणिक आहे !
घोटाळ्यावर घोटाळे सदनिका घोटाळे,
हेच घोटाळे बहाद्दरांचे टॉनिक आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9128
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
19 डिसेंबर2025
------------------------

No comments:
Post a Comment