Tuesday, December 16, 2025

बिबट्या : एक आयडिया....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------
बिबट्या : एक आयडिया
जंगल क्षेत्र सोडून गाव - शहरात,
बिबट्याचे भ्रमण एके भ्रमण आहे.
तसा हा प्रश्नही महत्त्वाचा वाटतो,
कुणाचे कुणावर अतिक्रमण आहे?
कितीही नकारात्मक असले तरी,
सकारात्मक घ्यायला जमले पाहिजे.
हागणदारी मुक्त गाव योजनेचा,
बिबट्याला ब्रँड अँबेसेडर नेमले पाहिजे.
आमची मागणी काही तशी उगीच नाही,
त्याचे पुरावेही हाती आलेले आहेत !
बिबट्यामुळे महाराष्ट्रातील अनेक गावे,
पूर्णतः हागणदारीमुक्त झालेले आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9125
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
16 डिसेंबर2025

 

No comments:

दुष्काळी पाहुणचार ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- दुष्काळी पाहुणचार दुष्काळ पाहणी दौरा बघून, आमचे मतही ठाम झाले. एकाचा पाहुणचार करताना, दुसरेच हकन...