Saturday, December 6, 2025

निमित्ताला कारण.... साप्ताहिक सरकारनामा मात्रिका


साप्ताहिक
वात्रटिका 
----------------------------

निमित्ताला कारण

कुठे लांबवला मुहूर्त, 
कुठे हनिमून लांबला आहे. 
स्थानिक स्वराज्य संस्थांचा, 
रंगलेला खेळ थांबला आहे.

प्रत्येकाची उत्सुकता शिगेला, 
उत्साह मात्र शमला आहे.
सहन होईना;सांगता येईना,
न्यायप्रविष्ट मामला आहे.

कुणाचा झाला जळफळाट,
कुणाचे खवळलेले पित्त आहे !
उद्याच्या पराभवासाठी, 
हाती आयतेच निमित्त आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
----------------------------
साप्ताहिक सरकारनामा 
वात्रटिका - 63
वर्ष- दुसरे
6 डिसेंबर 2025

No comments:

निमित्ताला कारण.... साप्ताहिक सरकारनामा मात्रिका

साप्ताहिक वात्रटिका  ---------------------------- निमित्ताला कारण कुठे लांबवला मुहूर्त,  कुठे हनिमून लांबला आहे.  स्थानिक स्वराज...