Thursday, December 18, 2025

बिनखात्याचे मंत्री .....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
बिनखात्याचे मंत्री
बिनखात्याचे का असेना,
शेवटी मंत्रीपद मंत्रीपद आहे.
सत्ता किती महत्त्वाची असते?
याचाच हा राजकीय बोध आहे.
खाते नसणे आणि खाते काढणे,
याच्यात मूलभूत फरक आहे !
राजकीय नैतिकतेचा मुद्दा,
इथे सर्वात जास्त कारक आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
आजची वात्रटिका - 50
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
18 डिसेंबर 2025

 

No comments:

बिनखात्याचे मंत्री .....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- बिनखात्याचे मंत्री बिनखात्याचे का असेना, शेवटी मंत्रीपद मंत्रीपद आहे. सत्ता किती महत्त्वाची असते...