आजची वात्रटिका
-----------------------
आकड्यात कमी दिसली तरी,
थंडी वास्तवात जास्त जाणवू लागते.
तरीही काही नशीबवान असे की,
त्यांना थंडी जास्तच मानवू लागते.
थंडीने कुणी कुणी काकडू शकतात,
थंडीने कुणी कुणी आखडू शकतात.
थंडी खाता-पिता न येणारे,
थंडीला तापमापकात पकडू शकतात.
काहींना जाणवते;काहींना मानवते,
थंडीचे असे गुलाबी गुपित आहे !
ज्याला थंडीचा फायदा घेता येत नाही,
तो मात्र नक्कीच शापित आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9123
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
14 डिसेंबर2025

No comments:
Post a Comment