आजची वात्रटिका
-----------------------
सत्ताधारी झाले सत्ताधारी,
विरोधकही सत्तावासी झाले.
सत्तेत नाही तर नाही,
किमान ते सत्तेपाशी गेले.
सत्तेची ऊब उबदार असते,
सुरक्षित सत्तेची छाया असते!
भल्या भल्यांना भुलविले,
अशी सत्तेची माया असते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 43
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
9 डिसेंबर 2025

No comments:
Post a Comment