Monday, December 29, 2025

भ्रामक वास्तव.....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------
भ्रामक वास्तव
त्यांचे त्यांना काहीच वाटत नाही,
लोकांना मात्र त्यांची लाज वाटते.
त्यांनी वेळीच समजून घ्यावे,
याची मात्र मोठी गरज आज वाटते.
ते नकट्यांच्या रांगेत उभे आहेत,
म्हणून त्यांना नाक शेंडेबाज वाटते.
गोंडे घोळण्याची सवय एवढी की,
त्यांना आपले शेपूट गोंडेबाज वाटते.
त्यांनी घेतले ओवाळून स्वतःला,
त्यांची आडवी तिडवी चाल आहे !
ज्यांच्या लबाडीवर शिक्कामोर्तब झाला,
त्यांच्याच पाठीवर आज गुलाल आहे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9137
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
29 डिसेंबर2025

 

No comments:

daily vatratika...29dec2025