Saturday, December 27, 2025

जुळे भाऊ .....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------
जुळे भाऊ
कालपर्यंत कुणी छोटे भाऊ होते,
कालपर्यंत कुणी मोठे भाऊ होते.
कोण मोठा? कोण छोटा ?
याचेसुद्धा उगीचच मोठे बाऊ होते.
जसा कुणी मोठा,कुणी छोटा होता,
तसा कुणी अधला मधला होता.
आपल्या मोठेपणाचा बाऊ करीत,
कुणी राजकीय स्वार्थ साधला होता.
उशिरा का होईना साक्षात्कार झाला,
आपण सगळेच दुधखुळे आहोत !
त्यांचाच त्यांनी निवाडा केला,
आम्ही सगळे भाऊ जुळे आहोत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9135
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
27 डिसेंबर2025

 

No comments:

तुलनात्मक चर्चा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- तुलनात्मक चर्चा नको त्यांची नको त्यांच्याशी, अप्रस्तुत अशी तुलना होते. एकाचे होते उदातीकरण, दुसऱ...