Tuesday, December 9, 2025

उलट्या बोंबा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------
उलट्या बोंबा
जात विचारू नये;जात सांगू नये,
तरीही आपली हौस पुरवली जात आहे.
जात मिरवू नये असे अपेक्षित,
तरीही अभिमानाने मिरवली जात आहे.
जात काही निसर्गदत्त नाही,
जात जन्माने कपाळावर थापली जाते.
अगदी जातीने जात जपताना,
जात नेहमीच स्वार्थासाठी जपली जाते.
कुणाला मोठे छोटे ठरविण्यासाठी,
अजूनही जातीचीच फुटपट्टी आहे !
जात सोडता सोडवत नसल्यामुळे,
जातीवरच आरोप; जात खूप हट्टी आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-9118
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
9 डिसेंबर2025

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...