Thursday, December 18, 2025

शिंके आणि बोके....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------
शिंके आणि बोके
शिंक्याचे तुटते; बोक्याचे फावते,
अशी राजकारणाची गत असते.
याचे अगदी शब्दशः प्रत्यंतर,
आपल्याला वेळोवेळी येत असते.
शिंके कोण? आणि बोके कोण?
हे सगळे काळच ठरवत असतो.
बिल्ल्या मांजरीच्या जीवावरच,
बोका बोकेपणा मिरवत असतो.
शिंक्याचे पुन्हा पुन्हा तुटण्यासाठी,
असत्यालाही शिंकायला लावले जाते !
शिंकेसुद्धा बोक्यांना सामील,
म्हणूनच तर बोक्यांचे फावले जाते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9127
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
18 डिसेंबर2025

 

No comments:

बिनखात्याचे मंत्री .....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- बिनखात्याचे मंत्री बिनखात्याचे का असेना, शेवटी मंत्रीपद मंत्रीपद आहे. सत्ता किती महत्त्वाची असते...