साप्ताहिक
वात्रटिका
--------------------------------
नगरपालिका ते महानगरपालिका
नगरपालिकेका निवडणूक निकालाची,
विधानसभा निकालाशी तुलना आहे.
ज्यांना नगरपालिकेत बंडाळी केली नाही,
त्यांना महानगरपालिकेत चालना आहे.
जणू नगरपालिकेची निवडणूक
महानगरपालिकेची ऑडिशन आहे.
आघाड्या, युत्या आणि बंडखोरांची,
महानगरपालिकेत नवी एडिशन आहे.
नगरपालिकेत लागलेल्या ठेवीमुळे,
वाटत नाही कुणी शहाणा झाला आहे !
आपल्या पराभवाच्या कारणाचा,
ईव्हीएम नेहमीचा बहाना झाला आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------
साप्ताहिक सरकारनामा
वात्रटिका - 66
वर्ष- दुसरे
27 डिसेंबर 2025

No comments:
Post a Comment