Monday, December 8, 2025

जागते रहो...आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

जागते रहो...

कार्यकर्त्यांच्या निष्ठा दर्शनाला,
निवडणूक आयोगाचा सहारा आहे.
ईव्हीएम च्या स्ट्रॉंग रूम भोवती,
हल्ली कार्यकर्त्यांचा पहारा आहे.

जागते रहो... रात्र वैऱ्याची आहे,
अशी कार्यकर्त्यांची गस्त आहे !
पैजा आणि बेटिंग लावण्यात.
दिवसा कार्यकर्ता व्यस्त आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
आजची वात्रटिका - 42
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
8 डिसेंबर 2025
----------------------------

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 29 जानेवारी 2026 l वर्ष- पाचवे l अंक -185 वा l पाने -60

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspot.com मर...