Saturday, December 27, 2025

ऑफर्स....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
ऑफर्स
इकडूनही ऑफर आहेत,
तिकडूनही ऑफर आहेत.
सगळीकडचेच बंडखोर,
ऑफरसाठी टॉपर आहेत.
रोखठोक काहीच नाही,
ऑफरचा खेळ उधार आहे!
फोडायला आणि जोडायला,
ऑफरचाच आधार आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
आजची वात्रटिका - 57
वर्ष पहिले
दैनिक मराठवाडा नेता
27 डिसेंबर 2025

 

No comments:

daily vatratika...27dec2025