Saturday, December 13, 2025

बिबट्याचा बंदोबस्त.....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------
बिबट्याचा बंदोबस्त
नागपूरच्या जोरदार थंडीमध्ये,
बिबट्या अधिवेशनावर स्वार झाला.
बिबट्याच्या बंदोबस्ताच्या चर्चेचा,
धमाकासुद्धा जोरदार झाला जोर.
उपायावर उपाय बघून,
बिबट्या गालात हसला असेल.
राज्यातल्या सर्व शेळ्यांना,
जोरदार धक्का बसला असेल.
हा काही चर्चेचा पूर्ण आढावा नाही,
हा आढावा तसा गाळीव आहे !
तुम्ही थोडी कल्पना करून बघा,
बिबट्या हा प्राणी पाळीव आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9122
वर्ष-25 वे
दैनिक झुंजार नेता
13 डिसेंबर2025

 

No comments:

राजकीय ट्रेंड ...आजची वात्रटिका .

आजची वात्रटिका ----------------------- राजकीय ट्रेंड त्याने त्याने ज्याचा त्याचा, राजकीय बाणा जपला आहे. तरी सांगता येत नाही, कोण बरका?कोण आप...