Wednesday, December 17, 2025

योजनांचे नामांतर....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------
योजनांचे नामांतर
जेव्हा कधी बदलते सत्ता केंद्र,
तेव्हा राजकीय कावे बदलले जातात.
चालू असलेल्या सरकारी योजनाची ,
टप्प्या टप्प्याने नावे बदलले जातात.
नामांतर आणि नाम विस्ताराचे,
कारणसुद्धा बरेच सबळ असते.
कितीही थापा मारल्या तरी,
ती वैचारिक द्वेषाची उबळ असते.
नामांतर आणि नाम विस्तारावरती,
सत्ताधाऱ्यांची वैचारिक छाया असते !
आलटून पालटून का होईना,
त्यांच्या वैचारिक दारिद्र्याची दया असते !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9126
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
17 डिसेंबर2025

 

No comments:

तुलनात्मक चर्चा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- तुलनात्मक चर्चा नको त्यांची नको त्यांच्याशी, अप्रस्तुत अशी तुलना होते. एकाचे होते उदातीकरण, दुसऱ...