आजची वात्रटिका
-----------------------
नको त्यांचाच उदो उदो,
नको त्यांचाच गाजावाजा आहे.
कळते त्यांनाही का वळत नाही?
हा रोकडा सवाल माझा आहे.
प्रश्नाने प्रश्न वाढत जातात,
म्हणून उत्तर टाळणे बरे नाही.
सवंग अशा झगमगटावर,
उठता बसता भाळणे बरे नाही.
बघता काय? सामील व्हा,
हेच व्यवहारीक ब्रीदवाक्य झाले!
मूग गिळ्यांची पैदास वाढल्याने,
त्यांनाही सारे काही शक्य झाले !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9138
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
30 डिसेंबर2025

No comments:
Post a Comment