आजची वात्रटिका
-----------------------
हम सब एक है म्हणणारे,
प्रत्यक्षात वेगवेगळे लढू लागले.
असे फक्त एकदाच नाहीतर
अगदी वारंवार घडू लागले.
स्वबळाच्या नाऱ्याचा,
सगळ्यांकडूनच पिच्छा आहे.
एकला चलो रे.....
म्हणे कार्यकर्त्यांची इच्छा आहे.
पक्ष वाढवावा लागतो,
कार्यकर्ता घडवावा लागतो !
कार्यकर्त्यांची जिरवण्यासाठी,
एकमेकांविरुद्ध लढवावा लागतो !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9129
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
21 डिसेंबर2025
----------------------------

No comments:
Post a Comment